Nashik Student Heart Attack: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अवघ्या 12 वर्षांच्या चिमुरडीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. ती इयत्ता सहावीत शिकत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. मात्र शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असतानाच तिचा चक्कर आली. गेटसमोरच ती चक्कर येऊन खाली पडली होती.
शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याने तिला हृदयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रेयाचे मुळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील असून तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया घरातील मोठी मुलगी तिला एक लहान बहिण देखील आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दोन घटनांत आश्रमशाळांतील दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गांडोळे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीचा शाळेची प्रार्थना सुरू असतानाच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्याच महिन्यात प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी माया संदीप भोये ही विद्यार्थिनी प्रार्थना सुरू असताना अचानक चक्कर येऊन पडली. तिला शिक्षकांनी तातडीने ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
FAQ
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमधील हृदयविकाराच्या घटनांना आनुवंशिक आजार, तणाव, चुकीचा आहार, आणि कमी शारीरिक हालचाल यांसारखी कारणे असू शकतात. याबाबत जागरूकता आणि नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
नियमित वैद्यकीय तपासणी करणे.
संतुलित आहार आणि नियमित व्यायाम.
तणाव व्यवस्थापनासाठी योग आणि ध्यान.
लहान मुलांमधील असामान्य लक्षणांकडे लक्ष देणे, जसे की छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, किंवा थकवा.
पालकांनी मुलांचे नियमित आरोग्य तपासणी करावी, त्यांच्या जीवनशैलीकडे लक्ष द्यावे, आणि हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, शाळांशी संपर्क ठेवून मुलांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे.