Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे.लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला ठेवल्याच्या रागातून मैत्रिणीनेच मित्राचा खून केला आहे. विल्होळीजवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ठेवल्याने कामगारनगर येथील इसम सूरज ऊर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे याचा दोघा जणांनी खून केला आहे. नाशिकच्या विल्होळी शिवारात धारदार हत्याराने डोक्यावर प्रहार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने मुख्य संशयित आरोपी शशिकांत ऊर्फ नाना रामदास गांगुर्डे यास ताब्यात घेतले असून त्याने साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे.
सातपूर भागातील कामगारनगर येथील रहिवासी असलेले सूरज यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला शनिवारी ठेवले होते. यामुळे त्यांची मैत्रीण संशयित इंदू विजय साळवे (रा. संघर्षनगर) हिने त्यांना फोन करून त्रास दिला होता. यामुळे सूरज हे विल्होळी येथील तिच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले असता, तिचा सख्खा भाऊ संशयित शशिकांत गांगुर्डे, नवीन सोनकांबळे, अजय रामदास कांबळे यांनी त्यांना मारहाण केली.
मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता ओवाडी नाला ते दरेगाव हिल टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर तरुणाचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. सदर तरुणाच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्याने सदर तरुण कोणासोबत होता याचा तपास आता पोलिस घेत आहेत