Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशिक विमान सेवा बंद, एअर डेक्कन कंपनीचे मौन

शहराची विमानसेवा अवघ्या 3 महिन्यात पूर्णतः बंद पडलीय. 23 डिसेंबरला मोठा गाजावाजा करून मुंबई नाशिक, नाशिक पुणे विमानसेवा सुरू झाली खरी... पण आता ही विमानसेवा पूर्णतः ठप्प झालीय. 

नाशिक विमान सेवा बंद, एअर डेक्कन कंपनीचे मौन

नाशिक : शहराची विमानसेवा अवघ्या 3 महिन्यात पूर्णतः बंद पडलीय. 23 डिसेंबरला मोठा गाजावाजा करून मुंबई नाशिक, नाशिक पुणे विमानसेवा सुरू झाली खरी... पण आता ही विमानसेवा पूर्णतः ठप्प झालीय. 

एवढंच नाही तर विमानं रद्द झाल्यामुळे अनेकांचे रिफंड अडकले आहेत. विमान कंपनी काहीही प्रतिसाद देत नाहीये. एअर डेक्कन कंपनीही मौन बाळगून आहे. त्यामुळे नाशिककरांची स्थिती तेल गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे अशी झालीय. 

Read More