Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशकात वाडा पडून एकाचा मृत्यू, पाचजणांना सुखरूप काढण्यात यश

 यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झालाय तर पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. 

नाशकात वाडा पडून एकाचा मृत्यू, पाचजणांना सुखरूप काढण्यात यश

नाशिक : नाशिकमध्ये वाडा कोसळलाय. जुन्या नाशिकमधल्या जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळून ही दुर्घटना घडलीय. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झालाय तर पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. दोन रहिवाशांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

वाडा धोकादायक 

 नाशकातील हे वाडे पडण्याच्या स्थितीत आहेत असे वारंवार सांगण्यात येत होते. पण नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही. अजूनही यामध्ये ४ ते ५ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पालकमंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. वाड्यातील वस्तू बाहेर काढण्यासाठी काहीजण गेले असता त्याचवेळी वाडा कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

Read More