Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान होणार भारताचे धार्मिक कॉरिडोर; केंद्राने दिला अ दर्जा

महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान होणार भारताचे धार्मिक कॉरिडोर होणार आहे.  केंद्राने या धार्मिक स्थळाला अ दर्जा दिला आहे. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान होणार भारताचे धार्मिक कॉरिडोर; केंद्राने दिला अ दर्जा

Nashik Trimbakeshwar Temple : महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान असलेलं त्र्यंबकेश्वर देवस्थान भारताचे धार्मिक कॉरिडोर होणार आहे.  त्र्यंबकेश्वर देवस्थानाला  अ दर्जा मिळाला आहे.  केंद्र सरकारच्या सुविधांपासून त्र्यंबकेश्वर वंचित होतं.  गिरीष महाजनांच्या शिफारशीला यश आले आहे. यामुळे देशभरातील भाविकांना याचा फायदा होणार आहे.

नाशिक जवळचे त्र्यंबकेश्वर हे  बारा ज्योतिर्लिंगापैकी तीर्थस्थान आहे.  त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अखेर  अ दर्जा मिळाला आहे. आत्तापर्यंत ब दर्जा असल्याने केंद्र शासनाच्या सुविधांपासून त्रंबकेश्वर वंचित होते.  परिणामी काशी विश्वनाथ ,वाराणसी, उज्जैन यांच्या कॉरिडॉर मध्ये त्रंबकेश्वरचा समावेश झाला नव्हता.  अनेक यात्रांसाठी कोट्यावधी रुपयांचे अनुदानापासून  त्रंबकेश्वरला उपेक्षित राहावे लागत होते.  केंद्र शासनाचा अ दर्जा मिळाल्याने त्र्यंबकेश्वर मध्ये धार्मिक कॉरिडोर   होऊ शकते.  ग्रामविकास खात्याच्या मंत्री असताना गिरीश महाजन यांनी शिफारस केली होती.  

नाशिक कुंभमेळ्यासाठी यूपीच्या धर्तीवर कायदा केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय... सोबतच नाशिकसह त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.. 
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली... बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलीय.

 

Read More