Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंनी पाडलं खिंडार, तब्बल 26 माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

Nashik Politics: आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. 

नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंनी पाडलं खिंडार, तब्बल 26 माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

Nashik Politics: पुणे पालिकेतील 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. नाशिक पालिकेतील माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक 26 च्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मधुकर जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित हा प्रवेश पार पडला.

 
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्यासह मनसेचे उपमहानगर संघटक बाजीराव दातीर यांनीदेखील अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. येत्या काळात आणखीन नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

Read More