Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्र हादरला! पोलीस उपनिरीक्षकाचे पोलीस महिलेसह धक्कादायक कृत्य; लैंगिक अत्याचार करत नग्न फोटो काढले आणि...

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षकाने पोलिस महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. 

महाराष्ट्र हादरला! पोलीस उपनिरीक्षकाचे पोलीस महिलेसह धक्कादायक कृत्य; लैंगिक अत्याचार करत नग्न फोटो काढले आणि...

Navi Mumbai Crime : महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस महिलेसह धक्कादायक कृत्य केले आहे. या पोलिस उपनिरीक्षकाने या महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचे नग्न फोटो देखील काढले. या प्रकरणी पोलिस उपनिकीक्षकासह त्याच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी मुंबईतील पनवेलमध्ये महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचे औषधं देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकारणी पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2020 साली नेरे येथे महिला पोलीसवर गुंगीचे औषधं टाकून लैंगिक अत्याचार करुन अर्धनग्न फोटो देखील काढून ठेवण्यात आले होते. सदर फोटो वायरल करण्याची धमकी देत तसेच लग्नाचे आमिष दाखवत मागील पाच वर्षांपासून आरोपी पोलीस उपनिरीक्षक जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण MIDCमध्ये एका नराधमानं कंपनीत जाणा-या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केलाय. 13 मे च्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला 24 तासांत अटक करण्यात आलीये.. पीडित महिला एका कंपनीमध्ये हेल्परचं काम करते.. घटनेच्या दिवसी ती रात्री साडेअकराच्या सुमारास कामावर निघाली होती. मेदनकरवाडी येथील कंपनीच्या जवळ येताच नराधमानं तिला जबरदस्तीनं ओढत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.. त्यानंतर तिला मारहाण करुन ठार मारण्याची धमकीही दिली.. त्यानंतर आरोपी फरार झाला.. स्थानिकांच्या मदतीनं पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी 24 तासांतच या नराधमाला बेड्या ठोकल्यात. आरोपी हा मूळचा अहिल्यानगरच्या अकोले गावचा आहे. त्यानं याआधीही असं कृत्य केलं आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. 

Read More