Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Navi Mumbai: शाळेतील भांडण जीवावर उठले, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Navi Mumbai  School Fight: नवी मुंबईतील एका शाळेबाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील भांडणात जीव गेला आहे. 

Navi Mumbai: शाळेतील भांडण जीवावर उठले, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Navi Mumbai Crime News:  शाळेतील विद्यार्थ्यांची गटा-तटाची भांडणे, हुल्लडबाजी या घटना काही नवीन नाहीत. मात्र, नवी मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणात एकाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. 

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. सी. वि. सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाला. या गंभीर घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत समताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यात हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. आदित्य भोसले असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

तुर्भे येथील मैदानात बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. बारावीसह इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला होता. शाळेत झालेल्या हा वाद शाळेबाहेर आल्यावर पुन्हा उफाळला. एका गटाच्या 10 ते 15 विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. तर, दुसरा मुलगा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळेतील विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. पालकही या गंभीर घटनेने धास्तावलेले आहेत. 

गंभीर घटनेचे कारण अद्यापही समोर नाही पण पोलिसांनी घटनेचा संशयित आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयत,जखमी आणि आरोपी मुलगा अकरावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. दहावीचा पेपर सुरू असताना बाहेर राडा झाला असून एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 
बुधवारी ही घटना घडल्यानंतर मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी काही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे तर, इतरांचा शोध सुरू आहेत. तसंच, या मुलांमध्ये वाद नेमका कशामुळं झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळं अल्पवयीन मुलांच्या होणाऱ्या वादांचे पडसाद इतक्या गंभीरपणे उमटू शकतात हे वास्तव समोर आले आहे. 

Read More