Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बाबा रामदेव यांच्या आश्रमात योगा शिकणाऱ्या अभिनेत्रीचं आमदाराशी प्रेम, असं झालं लग्न

नवनीत राणा यांच्या वैयक्तिक जीवनावर बरीच चर्चा झाली

बाबा रामदेव यांच्या आश्रमात योगा शिकणाऱ्या अभिनेत्रीचं आमदाराशी प्रेम, असं झालं लग्न

मुंबई : मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारणाचे वातावरण तापले आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदार संघातील अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला.  त्यानंतर नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (oksabha Speaker Om Birla) यांना पत्र लिहून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arawind Sawant) यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला. मात्र अरविंद सावंत यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

fallbacks

नवनीत राणा यांच्या वैयक्तिक जीवनावर बरीच चर्चा झाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे . त्यांचे वैयक्तिक जीवन देखील चर्चेत राहिले आहे. नवनीतने २०११ मध्ये अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदार संघातील आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले. नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांची भेट प्रथम बाबा रामदेवच्या आश्रमात झाली. त्यानंतर त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले.

fallbacks

नवनीत यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलगू चित्रपटांमधून केली. नवनीत कौर राणा या 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत जन्मल्या. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते आणि ते मूळचे पंजाबचे आहेत. नवनीत यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केले. 

मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्या चित्रपटांकडे वळल्या. कन्नड चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. यानंतर त्यांनी तेलगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले.

fallbacks

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नवनीत कौर यांचा योग आणि बाबा रामदेव यांच्याशी जवळंच नातं आहे. त्यांची पती रवी राणा(Navneet Kaurt-Ravi Rana Love Story) यांच्यासोबतची पहिली भेट बाबा रामदेव यांच्या आश्रमात होती. जेव्हा ते दोघे योग शिबिरात सहभागी घेण्यासाठी आले होते.

नवनीत-रवी यांचा विवाह

बाबा रामदेव यांच्या आश्रमात भेटल्यानंतर नवनीत कौर आणि रवी राणा एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 फेब्रुवारी 2011 रोजी नवनीत आणि रवि राणा यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले.

या विवाह सोहळ्यात एकूण 3162 जोडप्यांनी लग्न केले होते. त्यावेळी रवी राणा आमदार होते आणि यामुळे दोघांचे लग्न खूप चर्चेत होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव, सुब्रत रॉय आणि विवेक ओबेरॉय या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.

fallbacks

नवनीत कौर राणा वादात 

रवी राणा यांच्याशी लग्नानंतर नवनीत यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुक राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावती येथून लढवल्या. पण त्या पराभूत झाल्या.
यावेळी, त्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर विरोधी पक्षांकडून चौकशीची मागणी केली गेली. कोर्टाने मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश दिले. यानंतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या.

सर्वोत्तम कामगिरी 

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या (Amravati) खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांचा 25 श्रेष्ठ खासदारांच्या (25 best MP) यादीत समावेश करण्यात आला आहे. फेम इंडिया आणि आशिया पोस्ट (Fame India and Asia Post) सर्वेक्षणात विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 25 महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महिला सबलीकरण, सामाजिक स्थिती, संसदेतील उपस्थिती आणि सहभाग अशा विविध 10 निकषांवर भारतात हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

Read More