Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Navratri 2022 : राजकारण बाजूला सारत गरबा खेळण्यात रमल्या नवनीत राणा; पाहा प्रचंड Viral होणारा Video

Navratri 2022  : बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नृत्यानं अनेकांचंच लक्ष वेधलं. 

Navratri 2022 : राजकारण बाजूला सारत गरबा खेळण्यात रमल्या नवनीत राणा; पाहा प्रचंड Viral होणारा Video

Navratri 2022  navneet rana garba dance video : नवरात्सोवाची धूम सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. (Corona) कोरोना काळादरम्यान असणाऱ्या निर्बंधांतून मुक्तता मिळ्यानंतर आता सर्वचजण मनसोक्तपणे सणउत्सव साजरा करत आहेत. नवरात्रोत्सवाची झलक पाहता सध्या याची थेट प्रचिती येत आहे. 

नवरात्रोत्सव (Navratra) चांगलाच रंगात येत असताना सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीसुद्धा यात रमलेले दिसत आहेत यामध्ये नाव पुढे आहे ते म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं. (Navratri 2022 amaravati MP navneet rana garba dance video)

बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नृत्यानं अनेकांचंच लक्ष वेधलं. अमरावतीत नुकतंच गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं, ठेका धरण्यासाठी आलेल्या इतर महिलांसोबत खुद्द नवनीत राणासुद्धा गरबा खेळण्यात मग्न होत्या. त्यांचा हा गरबा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा Video शेअर केला असून, त्यावर बरेच लाईक्सही आले आहेत. 

Navratra 2022 : उदो बोला उदो! कशी साजरी होते छत्रपतींच्या घरातील नवरात्र? पाहा Video

नवरात्रोत्सवाची खरी धूम ही देवीच्या उपासनेसोबतच तिच्यासाठी खेळल्या जाणाऱ्या रास दांडिया आणि गरब्यामधूनही (Dandiya Garba) पाहायला मिळते. देवीची स्तुती करणाऱ्या गीतांवर ठेका धरत बेभान नाचणाऱ्यांना पाहून नकळतच आपलेही पाय थिरकतात. राणा यांचा हा व्हिडीओसुद्धा काहीसा असाच आहे. 

Read More