Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गडचिरोलीत पोलिस-नक्षल्यांमध्ये चकमक, १ जवान जखमी

नक्षल्यांसाठी शस्त्रं बनवणारं युनिट उद्ध्वस्त 

गडचिरोलीत पोलिस-नक्षल्यांमध्ये चकमक, १ जवान जखमी

गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली- भामरागड तालुक्याच्या सीमेवर पोलिस-नक्षली यांच्यात गेल्या काही तासात दोनदा चकमक झाल्या. यात एक जवान जखमी झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.  नक्षलवाद्यांच्या स्फोटकांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश आलं आहे. छत्तीसगडच्या या सीमावर्ती भागात गडचिरोली नक्षलविरोधी पथकाचे तब्बल १०० जवान सर्च ऑपरेशन राबवत होते. मात्र नक्षल्यांनी पथकाला घेरल्यानंतर जोरदार धुमश्चक्री उडाली.

या चकमकीत नक्षल्यांसाठी हत्यारं बनवणारा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश मिळालंय. पोलिसांच्या C-60 पथकाने ही कामगिरी केली आहे. नक्षल्यांच्या विरोधात भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात गेल्या ४८ तासांपासून कारवाई सुरू होती.

 

Read More