Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रायगडमध्ये राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र

राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्‍ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत. 

रायगडमध्ये राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र

रायगड : राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्‍ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत. 

शरद पवारांचा विश्वास

या दोन्‍ही शक्‍ती एकत्र आल्‍यामुळे ते राज्‍याच्‍या राजकारणाला नवी दिशा देतील असा विश्‍वास राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी व्‍यक्‍त केलाय. शरद पवार यांच्‍या संसदीय कारकर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्‍याबददल रायगड जिल्‍हा राष्‍ट्रवादी काँग्रेसतर्फे त्‍यांचा नागरी सत्‍कार तसेच जिल्‍हा मेळावा रोहा येथे आयोजित करण्‍यात आला होता. 

‘पराभवाचा वचपा काढतील’

यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा रायगडकर काढतील असेही ते म्‍हणाले.

तटकरेंची गीतेंवर टीका

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांनीही यावेळी केंद्रीय मंत्री गीते यांच्‍या टीकेला उत्‍तर दिले. मी उमेदवारी जा‍हीर करत नसलो तरी शरद पवार सांगतील तोच आमचा उमेदवार असेल. मात्र गीते यांच्‍या निवृत्‍तीचे दिवस जवळ आले असल्‍याचा टोला तटकरे यांनी लगावला.

Read More