Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

टपरीवर थांबून अजित पवारांनी मारला चहा-भजींवर ताव

हल्लाबोल यात्रेसाठी हिंगोलीकडे जाताना कळमनुरी जवळच अजित पवारांना चहा घ्यायचा होता. त्यांनी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितली. 

टपरीवर थांबून अजित पवारांनी मारला चहा-भजींवर ताव

हिंगोली : हल्लाबोल यात्रेसाठी हिंगोलीकडे जाताना कळमनुरी जवळच अजित पवारांना चहा घ्यायचा होता. त्यांनी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितली. 

माळेगाव फाट्यावर गाडी थांबली अजित दादांनी तिथे चहा, भजीचा आस्वाद घेतला. अजित पवार थांबले म्हटल्यावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह सर्वच नेते टपरीवर चहा प्यायला थांबले. 

चहा घेताना त्यांनी हॉटेल मालका़शी गप्पा मारून त्याचे झालेले १०० रु बिलही दिले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात निवडणूक दौर्‍यात अशा प्रकारे अनेक वेळा टपरीवर थांबून चहा आणि गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतला होता.

Read More