पुणे जिल्ह्यातील इंदपूरमधील विश्रामगृहात सत्कार समारंभाचा कार्यक्रमत होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. पण या कार्यक्रमात अनेकदा वीजपुरवठा खंडीत होत होता. यामुळे कार्यक्रमात होत असलेल्या गैरसोयीमुळे उपस्थित सर्वच थोडेसो गोंधळले. यावेळी छगन भुजबळ देखील संतापले आणि ते व्यासपीठावरुन खाली उतरले.
सत्कार स्वीकारताना छगन भुजबळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तेथे उपस्थित असलेल्या पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पुढे भुजबळ म्हणाले की, 'दहा सेकंद येते 10 सेकंद जाते. बंद करायची आहे ना? मग बंद करून टाका असे म्हणत भुजबळ भडकल्याचे दिसले.
यावर पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांनी सारवासारव केल्याच दिसून आलं. सकाळपासून हा प्रकार सुरु आहे. पण तुम्ही येणार आणि हा सत्कार सोहळा आहे. असं सांगूनही हा प्रकार घडला, असं उत्तर पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्याने दिली.
वीज पुरवठा खंडित होत असल्याने बांधकाम विभागाच्या व्यवस्था पाहून मंत्री भुजबळ चांगलेच भडकल्याच दिसून आलं. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. शेतकरी कर्जमाफी ते माणिकराव कोकाटेंच्या वादावर त्यांनी भाष्य केलं. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर छगन भुजबळ संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. पत्रकारांनी यावेळी असा प्रश्न विचारला की,'29 ऑगस्टला जरांगे 'चलो मुंबई' अशी घोषणा दिली आहे. ते मुंबईला काही सहकाऱ्यांसह आंदोलन करणार आहेत? तसेच ते पुन्हा सरकारवर दबाव टाकणार आहेत'. त्यावर छगन भुजबळांनी हावभाव बदलत उत्तर दिलं,'काय त्याचं घेऊन बसलाl तुम्ही?का तो आज एक बोलतो, उद्या दुसरं? कुठे तुम्ही हे प्रश्न विचारता' असं उत्तर भुजबळांनी देत हा विषय टाळला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासन भिकारी आहे, शेतकरी नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याबाबत भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले की,' मी यावर जास्त बोलू इच्छित नाही. विरोधी पक्ष अशा गोष्टींचा फायदा घेणारच आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली नापसंती या दोन दिवसात दोन वेळा व्यक्त केली आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.'