Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धनजंय मुंडेंनी 2 लाखांची पोटगी देण्याच्या आदेशाला दिलं कोर्टात आव्हान, करुणा शर्मा म्हणाल्या 'यांना साधं...'

Dhananjay Munde on Alimony: वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना करुणा शर्मांना (Karuna Sharma) 2 लाखांचा देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव  घेतली आहे.   

धनजंय मुंडेंनी 2 लाखांची पोटगी देण्याच्या आदेशाला दिलं कोर्टात आव्हान, करुणा शर्मा म्हणाल्या 'यांना साधं...'

Dhananjay Munde on Alimony: वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना करुणा शर्मांना (Karuna Sharma) 2 लाखांचा देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव  घेतली आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना जी 2 लाखांची देखभाल खर्च देण्यास सांगितली आहे त्यातील 1 लाख 25 हजार उदरनिर्वाहासाठी आहेत. तर 75 हजार मुलीचं लग्न होईपर्यंत तिच्या देखभालीसाठी आहेत. मुलगा सज्ञान असल्याने त्याला कोणतेही पैसे मिळणार नाहीत. मात्र करुणा शर्मा या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

करुणा शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "2 लाख रुपये देखभालीसाठी जे मागितले आहेत, तेदेखील त्यांना द्यायचे नाहीत. वाल्मिक कराडकडे साडेचार हजार कोटींची प्रॉपर्टी निघाली आहे. पण स्वत:ची बायको, जी मुंडे घराण्याच्या उत्तराधिकाऱ्याची जी आई आहे, 1.25 लाख आणि मुलीला 75 हजार देण्याचा आदेश आहे. पण त्यांनी सत्र न्यायालयात याचिका केली असून, अनेक दावे केले आहेत". 

'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'

 

पुढे त्यांनी सांगितलं की, "कोर्टात 21 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यावेळी मला माझी कमाई, कंपनी यासंदर्भात सांगायचं आहे. माझा पक्ष आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यासाठी फक्त 10 हजार लागतात. फक्त 10 हजारांचा डीडी लागतो. माझ्याकडे कंपनी आहे असंही त्यांनी सांगितलं. पण कंपनी सात वर्षांपासून बंद पडली असून, एक रुपयाही मिळत नाही. हे सर्व मी न्यायाधीशांसमोर मांडणार आहे. तिथेही ते तोंडावर पडणार आहेl आणि तिथूनही देखभाल खर्च देण्याचा आदेश मिळेल".

'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'

 

"किमान मला महिन्याला 15 लाख हवे आहेत.  न्यायाधीशांनी आम्हाला 2 लाख देण्यास सांगितलं आहे. रक्कम वाढवण्यासाठी मी अर्ज करणार आहे. 2 लाखांची घराचा हफ्ता आणि 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलीचं लग्न जवळ आलं आहे. 2 लाखात आम्ही काय करणार आहोत?," असंही त्यांनी म्हटलं आहे. 

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट

करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने पोस्ट टाकून खालील प्रमाणे खुलासा केला आहे. "मी सीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलं आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नव्हता.  माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची", असा खुलासा त्याने केला आहे. 

Read More