Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जितेंद्र आव्हाड यांना संपवण्याची धमकी, आव्हाड समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप

धमकी देणारा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

जितेंद्र आव्हाड यांना संपवण्याची धमकी, आव्हाड समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप

Thane :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर (Mahesh Aaher) याला आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोप दिलाय.  महेश आहेर हा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यानं तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी (Thane Police) आहेरला ताब्यात घेतलं. मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलीस स्टेशनबाहेर चांगलाच चोप दिला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच पेटलंय. 

Read More