Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना साद, बंडखोर आमदार गेले तरी...

Sharad Pawar appeals to Uddhav Thackeray :आगामी निवडणुका एकत्र लढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.  

शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना साद, बंडखोर आमदार गेले तरी...

मुंबई : Sharad Pawar appeals to Uddhav Thackeray :आगामी निवडणुका एकत्र लढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. बंडखोर आमदार गेले तरी शिवसैनिक मनातून शिवसेनेतच  आहेत. त्यामुळे एकत्र लढलो तर वेगळं चित्र दिसेल असं पवारांनी म्हंटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का, याची उत्सुकता आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. शिवसेनेच्या 40 आमदरांनी बंड केल्याने हे सरकार कोसळले.

शरद पवार पुढे म्हणाले, मी दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक मला भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्याबाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत.

तसेच अनेकजण मला बोलले की, 40 मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असे पवार यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे आता पवार यांच्या सांगण्यावरुन मुख्यमंत्री पद घेतलेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे. पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी राहणार का की शिवसेना एकला चलो रेचा नारा देणार, याकडे लक्ष लागले आहे.

Read More