Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maharastra Politics: शरद पवार भाजपसोबत जाणार? अजित पवारांसोबतच्या 'गुप्त' बैठकीवर म्हणाले...

Sharad Pawar on Ajit pawar meeting: अजित पवार माझा पुतण्या आहे, त्यामुळे भेटीत गैर काय? असा सवाल शरद पवार यांनी म्हटलं आहे. कालची आमची बैठक काही गुप्त नव्हती, असंही शरद पवार म्हणाले आहेत. 

Maharastra Politics: शरद पवार भाजपसोबत जाणार? अजित पवारांसोबतच्या 'गुप्त' बैठकीवर म्हणाले...

Sharad Pawar on Ajit pawar meeting: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून आलं होतं. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार माझा पुतण्या आहे, त्यामुळे भेटीत गैर काय? असा सवाल शरद पवार यांनी म्हटलं आहे. घरच्या माणसाला भेटण्यात गैर काय? कालची आमची बैठक काही गुप्त नव्हती, असंही शरद पवार म्हणाले आहेत. भाजपसोबत न जाणाच्या माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असंही शरद पवार यांनी ठामपणे सांगितलं. गुप्त बैठकीवर प्रश्न केला असता. ही बैठक नव्हती, संभ्रमता निर्माण झाली कारण तुम्हाला उद्योग नव्हते, असं शरद पवार यांनी म्हटलं. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये हशा पिकल्याचं दिसून आलं.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी माझी स्पष्ट भूमिका मांडतो की आम्ही भाजपसोबत जाणार नाही. मुंबईमध्ये प्राथमिक अंजेडा ठरवण्यासाठी बैठक आहे. त्यावेळी तीस ते चाळीस नेते आम्ही एकत्र येणार आहोत. लोकांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. माझ्यामते सामान्य लोकांना ते मान्य नाहीये. त्यामुळे जेव्हा यावेळी मत देण्याची वेळ येईल, त्यावेळी सामन्य लोकांकडून त्यांना त्यांना सहन करण्याची वेळ येईल, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

मणिपूरचा भाग हा सेन्सिटिव्ह भाग आहे. त्यामुळे आत्तापर्यंत नॉर्थ ईस्टचा प्रश्न गांभिर्याने स्विकारायचा, अशी भूमिका संसदेत सर्वांनी स्विकारली होती. मात्र, पंतप्रधानांनी लोकांचे प्रश्न, मणिपूरचा प्रश्न मांडले नाही. त्यांची ही भूमिका योग्य नव्हती, असं म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या भाषणावर टीका केली.

Read More