Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप; सरकारने 'त्या' लाभार्थ्यांना दिला कारवाईचा इशारा

लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला आहे  

लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप; सरकारने 'त्या' लाभार्थ्यांना दिला कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी एक खळबळजनक आरोप केला आहे. लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप सुळेंकडून करण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी केलेले आरोप सत्ताधा-यानी फेटाळले आहेत. लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाला असं बोलणं चुकीचं असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं आहे. तर आदिती तटकरेंनी देखील सुळेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

लाडकी बहीण योजनेवरुन पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक गंभीर आरोप केला आहे. लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सुप्रिया सुळेंच्या आरोपांनंतर मंत्री आदिती तटकरेंनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. शासनाची दिशाभूल करणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर भावांनी डल्ला मारल्याचं देखील समोर आलं होतं. दरम्यान यावरून देखील सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला आहे. पुरुषांच्या अकाऊंटमध्ये पैसे जातात कसे? बहिणींच्या नावावर दुस-यांनीच पैसे नेल्याचा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.. तर सर्व अर्जाची छानणी केल्यानंतरच किती पुरूषांनी लाभ घेतला ते कळेल असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलं आहे. 

सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप उद्योगमंत्री उदय सामंतांनी फेटाळले आहेत. लाडकी बहीण योजनेत स्कॅम झाला असं बोलणं चुकीचं असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं आहे. तर लाडकी बहीण योजनेवरून जितेंद्र आव्हाडांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रावर 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची राज्य सरकारनं सामुहिक जबाबदारी घ्यावी असंही यावेळी सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे आरोप सत्ताधा-यांकडून फेटाळण्यात आले आहेत.

Read More