बारामतीत काका अजित पवारांना टक्कर युगेंद्र पवार यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी दिली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. सुप्रिया सुळेंनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सगळ्यांना एकच सुखद धक्का दिला आहे.
सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेनचा साखरपुडा सुंदर तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर भरपूर प्रेम आणि आनंद मिळो ही प्रार्थना. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे!, अशी खास पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे.
युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. 22 एप्रिल 1991 रोजी युगेंद्र पवार यांचा जन्म झाला. युगेंद्र यांनी अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचं शिक्षण घेतल आहे. तसेच युगेंद्र हे शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा 10 एप्रिल रोजी पुण्यात शाही साखरपुडा पार पडला. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवी पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत जय यांचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन पुण्यातील अजिक पवारांच्या फार्महाऊसवर करण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटूंब एकत्र आलं होतं. आता युगेंद्र पवार यांच्या लग्नसोहळ्याला हे कुटूंब एकत्र येणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.