Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बारामतीत कालवा फुटला; भयानक पाऊस, पाण्याच्या प्रचंड वेग आणि...

बारामती नीरा डावा कालवा फुटला आहे.  हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.

बारामतीत कालवा फुटला; भयानक पाऊस, पाण्याच्या प्रचंड वेग आणि...

Neera Canal Burst In Baramati  Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातला आहे. मे महिन्यातच राज्यभरात तुफान पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अशातच बारमतीत भयानक पाऊस झाला आहे.  पाण्याच्या प्रचंड वेगामुळे बारामतीचा नीरा डावा कालवा फुटला आहे. 

बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फूटला आहे. कालवा फुटल्याने  हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. कालव्याचे पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले आहे. हा महामार्ग जलमय झाला आहे. खरबदारी म्हणून  रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा आहे. कालवा फुटून कालव्यातील पाणी  शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये  घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील ओढ्याला पूर आलेला आहे. या पुराचे पाणी सणसर गावातील अनेकांच्या घरात शिरलेल आहे. अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचं यामध्ये मोठ नुकसान झालंय. सणसर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ओढा तुडुंब भरून वाहतोय तर पुणे बारामती मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालीय.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचतय. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तर अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेत. 

Read More