Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नेपाळच्या तरुणीला पालघरमध्ये संपवले; वाटाण्याच्या गोणीने उलगडले रहस्य, BF च्या वडिलांनी...

Palghar Crime News:  नेपाळच्या तरुणीला पालघरमध्ये आणून तिची हत्या करण्यात आली होती. 

नेपाळच्या तरुणीला पालघरमध्ये संपवले; वाटाण्याच्या गोणीने उलगडले रहस्य, BF च्या वडिलांनी...

Palghar Crime News: नेपाळच्या तरुणीची पालघरमध्ये हत्या करण्यात आली आहे. प्रियकर आणि त्याच्या वडिलांनीच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी नेपाळमध्ये पळून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. दोघंही नेपाळमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी शिमला मार्गे ते महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल दादरा नगर हवेली येथे पोहोचले. त्यानंतर तिथे एका साथीदाराच्या मदतीने मनोर त्र्यंबक मार्गावर मोखाडा जवळ रात्री बारा वाजताच्या सुमारास या तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या करत मृतदेह पुलाखाली फेकला होता. मटारच्या गोणीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 

पोलिसांनीदेखील मटारच्या गोणीत मृतदेह आढळून आल्याने पालघर पोलिसांनी चक्र फिरवली असून एस एल 28 या गोणी वरील मार्क वरून आरोपींचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे मटार पार्सल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोणीवरून पोलिसांना या हत्त्येचा छडा लावला आहे. 

मयत तरुणी हिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने प्रियकरासमोर लग्नाचा तगादा लावला होता. यालाच कंटाळून प्रियकराने आपले वडील आणि एका साथीदाराला सोबत घेत प्रेयसीचा काटा काढला असून या प्रकरणात पालघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर आणखीन एक आरोपी पुन्हा नेपाळमध्ये पसार झाला असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून घेतला जातोय .

भूतानच्या तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

2020 पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केला. राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना अटक केली आहे. कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी 2 तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून शंतनु कुकडे यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे

Read More