Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Matheran: नेरळ ते माथेरान... महाराष्ट्रात नविन रोपवे सेवा; डोंगर दऱ्यातुन पर्यटकांचा थरारक प्रवास

Neral Matheran Ropeway : नेरळ ते माथेरान प्रवास आता रोपवेतून करता येणार आहे. माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांना डोंगर दऱ्यातुन पर्यटकांचा थरारक प्रवास अनुभवता येणार आहे. 

Matheran: नेरळ ते माथेरान... महाराष्ट्रात नविन रोपवे सेवा; डोंगर दऱ्यातुन पर्यटकांचा थरारक प्रवास

Neral Matheran Ropeway Matheran Hill Station :  माथेरान... महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन माथेरान हे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. अनेक परदेशी पर्यटक देखील माथेरानला आवर्जून भेट देतात. शुद्ध आणि थंड हवा तसेच दऱ्या-खोऱ्यांमधून दिसणारे विहंगम दृश्य... माथेरानचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. चोहीकडे हिरवळ, डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि समोरचं माणुसही दिसणार नाही इतकं दाट धुकं... पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अधिकचं खुलून दिसते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे स्वर्ग सुखचं म्हणावे लागेल.  याच माथेरानचा प्रवास आता   रोपवेतून करता येणार आहे. लवकरचं  नेरळ ते माथेरान रोपवे सेवा सुरु होणार आहे.

माथेरान हिल स्टेशन हे सह्याद्रीच्या पर्वतरांगां मध्ये  2600 फुट उंचीवर वसलेले आहे. माथेरान हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 803 मीटर उंचीवर आहे. माथेरान हे फक्त महाराष्ट्रातीलचं नाही तर आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. यामुळेच प्रदुषण मुक्त पर्यटळ स्थळ म्हणून देखील माथेरान ओळखले जाते.  मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाट चढल्यावर माथेरनच्या पायथ्यापर्यंत जाता येते. वाहने फक्त इथं पर्यंतच जातात. येथून गेल्यावर माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. येथे गेल्यावर वाहने पार्क करुन पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. 

रेल्वेने गेल्यास नेरळ स्टेशनवरुन माथेरानला जाण्यासाठी स्पेशल टॉयट्रेन आहे. मात्र, पावसाळ्यात ही टॉयट्रेन बंद असते. नेरळ ते माथेरान हा 11 किमी चा मार्ग आहे.  टॉय ट्रेनने तब्बल अडीच तास लागतात.मात्र, आता मार्गावर टॉयट्रेनला पर्याय म्हणून रोपवे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे अवघ्या काही मिनीटांत रोपवेने नेरळहून माथेरानला पोहचता येमार आहे. हा आशिया खंडातील सर्वात लांब रोप-वे असणार आहे. फक्त पर्यटकच नाही तर इथल्या स्थानिकांना देखील ही रोपवे सेवा फायदेशीर ठरणार आहे.  एमएमआरडीएच्या माध्यतून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

Read More