Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दोन्ही ठाकरेंमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण? आदित्य आणि अमित यांच्या सपत्तीवरुन सगळं लक्षात येईल

उद्धव ठाकरे की राज ठाकरे या दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? या दोघांची मालमत्ता जाहीर नसली तरी मुलांच्या संपत्तीवरुन याचा अंदाज लावता येवू शकतो. 

 दोन्ही ठाकरेंमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण? आदित्य आणि अमित यांच्या सपत्तीवरुन सगळं लक्षात येईल

Net Worth Of Raj Thackeray And Uddhav Thackeray :  दोन्ही ठाकरे एकत्र येणार... संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ही एकच चर्चा सुरु आहे. तब्बल 21 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची देखील नेहमीच चर्चा होत असते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सर्वात श्रीमंत कोण या प्रश्नाचे उत्तर थेट सापडणार नाही. मात्र, आदित्य ठाकरे  आणि अमित ठाकरे यांच्या सपत्तीवरुन या दोन्ही ठाकरे बंधूंच्या संपत्तीचा अंदाज लावता येईल. 

ठाकरेंची संपत्ती किती, या प्रश्नाचं उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले. उमेदवारी अर्ज भरताना या ठाकरेंनी आपली संपत्ती किती याची माहिती सादर केली. यनिमित्ताने पहिल्यांदाच ठाकरेंनी संपत्ती जाहीर केली.

आदित्य उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?

आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती 16 कोटी 5 लाख ५ हजार 258 रुपये इतकी आहे.  त्यामध्ये स्थावर मालमत्ता - 4 कोटी 67 लाखांची,   बँक ठेवी - 10 कोटी 36 लाख , बॉन्ड शेअर्स - 20 लाख 39 हजार, साडे सहा लाखांची बीएमडब्ल्यू कार, 64 लाख 65 हजारांचे दागिने,   कल्याणमधल्या श्रीजी आर्केडमध्ये आदित्य ठाकरेंचं दुकान आहे. हे दुकान आई रश्मी ठाकरेंनी गिफ्ट दिलंय. घोडबंदर रोडलाही त्यांचं दुकान आहे. या दोन्ही दुकानांची किंमत 3 कोटी  89 लाख 40हजार आहे.  खालापूरमध्ये उद्धव ठाकरेंनी गिफ्ट दिलेली जमीन आहे, त्याची किंमत 77 लाख 66 हजार एवढी आहे. आदित्य ठाकरे व्यवसाय करतात, मात्र कुठला हे त्यांनी प्रतित्रा पत्रात नमूद केले नाही.  आदित्य ठाकरेंच्या नावावर कुठलंही कर्ज नाही, एकत्रित हिंदू कुटुंब असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत. सेंट झेवियर्स कॉलेजमधून  बीए पदवी, के.सी कॉ़लेजमधून लॉ ग्रॅज्युएट, असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.  विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे यांनी आपलं उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले. त्यात ठाकरे यांच्याकडे 143 कोटी 20 लाख 74 हजार 763 रुपयांचं उत्पन्न दाखवण्यात आले.

तर, दुसरीकडे राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करना प्रतिज्ञापत्रकाद्वारे आपल्या नावावर असलेल्या संपत्तीविषयी देखील माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नावावर 12 कोटी 54 लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर 1 कोटी 29 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अमित ठाकरे यांच्यावर 4 कोटी 19 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला 1 लाख 8 हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात 40 लाख 99 हजार 763 रुपये इतकी रक्कम आहे.

 

Read More