Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

2900 कोटींचा प्रकल्प, पुणे हायवे 10 मिनिटांत गाठता येणार; नवीन महामार्ग उभारण्यात येतोय

Mumbai Live News Today: महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे पसरवण्यात येत आहे. आता आणखी एका महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. 

 2900 कोटींचा प्रकल्प, पुणे हायवे 10 मिनिटांत गाठता येणार; नवीन महामार्ग उभारण्यात येतोय

Mumbai Live News Today: देशातील पाच प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर किंवा न्हावा शेवावर येणाऱ्या कंटेनरची वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी जीएनपीएपासून जुन्या पुणे महामार्गापर्यंत एक महामार्ग बनवण्यात येणार आहे. या महामार्गासाठी एकूण 2,900 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. तर 29 किमी लांबीच्या या महामार्गाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) करण्यात येत आहे. 

दररोज पाच हजारांपेक्षा जास्त कंटेनर आणि ट्रक पुण्याकडे जेएनपीएकडून येतात. त्याच संख्येने उत्तरेकडून ठाण्याकडे ट्रक येतात. या दोन दिशांनी येणारे ट्रक ठाणे-बेलापूर रोड किंवा पुणे एक्स्प्रेसवरुन पनवेल किंवा बेलापूर, खारघर क्षेत्रातील रस्त्यांचा वापर करतात. या प्रकारे दररोज 10,000 मालवाहक या क्षेत्राचा वापर करतात. यामुळं कधीकधी वाहतूक कोंडी होते आणि स्थानिकांनादेखील त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एनएचआयने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

जेएनपीए जवळील पागोटे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या चौकात एक नवीन महामार्ग बांधला जाईल. पागोटे हे राष्ट्रीय महामार्ग ३४८ वर असून जो बेलापूर ते जेएनपीए रस्त्यावर बांधला जाणार आहे. हा नवीन महामार्ग तिथून थेट चौकापर्यंत २९.२१९ किलोमीटर लांब असेल. हा महामार्ग प्रामुख्याने उंचावर असून दोन बोगदे असणार आहेत. हा महामार्ग ६० मीटर रुंद आणि सहा पदरी असेल. 
महामार्गामुळं दक्षिणेकडून (पुण्याच्या दिशेने) येणाऱ्या वाहनांना पनवेल किंवा बेलापूरपर्यंत येण्याची आवश्यकता राहणार नाही. ते थेट जेएनपीएशी संपर्क साधू शकतील. त्याचप्रमाणे, उत्तरेकडून येणारी वाहने देखील जुन्या पुणे महामार्गावरून चौकात पोहोचू शकतील. ज्यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळता येईल आणि दहा मिनिटांत थेट जेएनपीएला पोहोचता येईल.

या महामार्गावर तीन इंटरचेंज आहेत

या महामार्गाद्वारे राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरील चिरनेर, गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडले जातील. याशिवाय, 'अटल सेतू' मार्गे येणारी वाहने देखील चिरनेरजवळील या महामार्गावर पोहोचू शकतील. हा पूर्णपणे नवीन महामार्ग असल्याने, NHAI ने त्याला 'अ' श्रेणीतील महामार्ग म्हणून वर्गीकृत केले आहे. 

Read More