पुणे : कस्पटे कुटुंबीयांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात बावधन पोलिसांनी लुक आउट नोटीस जारी केली. निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. बावधन पोलिसांत निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
निलेश चव्हाणविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्या प्रकरणी निलेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण घेऊन गेला होता. त्यानंतर कस्पटे कुटुंबिय निलेशकडे बाळ घेण्यासाठी गेलं होतं. दरम्यान यावेळी निलेशनं कस्पटे कुटुंबाला धमकावलं होतं. निलेश चव्हाणनं कस्पटे कुटुंबाला पिस्तुल दाखवत धमकी दिली होती. या प्रकरणी निलेश चव्हाणवर बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्या दिवसापासून निलेश चव्हाण हा फरार झाला आहे. पोलिसांच्या तीन पथकाकडून निलेश चव्हाणचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : अवकाळीचा जोर शेतकऱ्यांच्या जिवाला घोर, अवकाळीनं शेतकरी देशोधडीला
काल निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. तसंच निलेश चव्हाणचं लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केलं होतं. निलेश चव्हाणनं धमकी दिल्यापासून कस्पटे कुटुंबाला जिवाची भीती वाटते आहे. कारण निलेश चव्हाण हा विकृत आहे तो काहीही करू शकतो. हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलंच आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे.
निलेश चव्हाणचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. आणि या हगवणे कुटुंबासारखाच तो देखील क्रूरच आहे. त्यानं देखील त्याच्या पत्नीचा छळ केला आहे. तसंच तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील त्यानं काढले आहेत. पोलिसांचे तीन पथक मागावर असून देखील निलेश चव्हाण हा पोलिसांना का सापडत नाही? कोणत्या बिळ्यात निलेश चव्हाण जाऊन बसलाय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.