Nilesh Rane to Uddhav Thackeray: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर आता राज्याचा शपथविधीदेखील पार पडला असून यात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपचे नेते नितेश राणे यांनी शपथ घेतली. यानंतर त्यांचे बंधू निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले निलेश राणे? जाणून घेऊया.
3 राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार आहे. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की, देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो, असे निलेश राणे म्हणाले. तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आल्याचे ते उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा.आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, असे आवाहन त्यांनी केले. तुम्हालाही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठीण होईल, असे निलेश राणे ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला ठाकरे-राणे वाद तसा नवा नाही. एकाने वार केला की दुसरा प्रहार करतो, हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याने पाहिले आहे. आता राणेंच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते? हे पाहणे महत्वाचे आहे.
श्री. उद्धव ठाकरे,
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) December 15, 2024
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की… pic.twitter.com/xUVE216rlu
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,राधाकृष्ण विखे पाटील,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,गणेश नाईक,मंगलप्रभात लोढा,जयकुमार रावल,पंकजा मुंडे,अतुल सावे,अशोक उईके,आशिष शेलार,शिवेंद्रराजे भोसले,जयकुमार गोरे,संजय सावकारे,नितेश राणे,आकाश फुंडकर,माधुरी मिसाळ,पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली.शिवसेनेत गुलाबराव पाटील,दादा भुसे,संजय राठोड,उदय सामंत,शंभुराज देसाई,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,भरत गोगावले, प्रकाश आबिटकर,आशिष जायस्वाल आणि योगेश कदम यांनी शपथ घेतली.