Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगाबादमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

पैठण रस्त्यावर गेवराई तांडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झालेत.

औरंगाबादमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : पैठण रस्त्यावर गेवराई तांडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झालेत. पाण्याचा टँकर आणि अॅपे रिक्षा यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. या दुर्घटनेत रिक्षात बसलेल्या 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अॅपे रिक्षा ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या पाण्याच्या टँकरला धडकली आणि हा अपघात झाला. हा अत्यंत छोटा रस्ता असून रिक्षा बेशिस्त पद्धतीनं चालवल्या जातात. या अपघातामुळे औरंगाबाद पैठण रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

Read More