Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Malhar Certification: आम्ही हलाल मटणच विकणार; नितेश राणे यांना नाशिकच्या खाटीक समाजाचा जबरदस्त झटका

मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंना हिंदू खाटीकांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदूंना हिंदुंची मटणाची दुकानं ओळखायला मदत होईल असा दावा नितेश राणेंनी केला. मात्र, आम्हाला कुणाच्याही सर्टीफिकेटची गरज नसल्याची भूमिका नाशिकच्या खाटीक समाजाने घेतली आहे. तसेच आपण हलाल मटणच विकणार असल्याचा निर्धारही नाशिकच्या खाटीक समाजानं व्यक्त केला आहे.   

Malhar Certification: आम्ही हलाल मटणच विकणार; नितेश राणे यांना नाशिकच्या खाटीक समाजाचा जबरदस्त झटका

Nitesh Rane Halal vs Malhar Certification: राज्याचे मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदूंना हिंदूंच्या मालकीची मटण दुकाने ओळखण्यास मदत होईल, जी शुद्ध मांस विकतील  असा नितेश राणेंनी दावा केला आहे. मात्र, नितेश राणेंच्या या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाने विरोध केला आहे. नाशिकच्या खाटीक समाजाने हलाल मटण विकण्याचा निर्णय घेतला आहे. नितेश राणेंनी घेतलेल्या या भूमिकेला खाटीक समाजाने तीव्र विरोध केला आहे. 

तर, आम्ही जन्मजात खाटीक आहोत आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याची भूमिका नाशिकच्या खाटीक समाजाने घेतली आहे. तर, कुणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत नितेश राणेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
दरम्यान हलाल, झटका मटणावरून सुरु असलेल्या वादावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे हा संधीसाधू माणूस असून ते भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

नितेश राणे काय बोलले मला माहित नाही. मात्र, अशी जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य कुणी करू नयेत अशी प्रतिक्रीया जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली आहे. नितेश राणेंनी मल्हार सर्टीफिकेटची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी आधी त्यांच्या भूमिकेला विरोध केला होता. आता मात्र खाटीक समाजातूनही त्यांच्या भूमिकेला विरोध होताना दिसत आहे. नाशिकच्या खाटीक समाजाने तर थेट भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील इतरह ठिकाणांहून हा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More