Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत मुस्लीम धर्माचे मावळे नव्हते; नितेश राणेंच्या दाव्यानं वादाचा भडका

आमदार नितेश राणे यांनी एक अत्यंत वादग्रस्त दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत मुस्लीम धर्माचे मावळे नव्हते असा नितेश राणेंचा दावा आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत मुस्लीम धर्माचे मावळे नव्हते; नितेश राणेंच्या दाव्यानं वादाचा भडका

Nitesh Rane Controversial Speech : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम मावळे नव्हते असा वक्तव्य करुन नितेश राणेंनी नवा वाद ओढवून घेतलाय. नितेश राणेंच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका केली आहे. नितेश राणे पक्ष बदलतात तसा इतिहास बदलतात असा आरोपही विरोधकांनी केला आहे. भाजपचे नेतेही नितेश राणेंचं समर्थन करताना दिसत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत मुस्लीम धर्माचे मावळे नव्हते असा दावा नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणेंच्या या दाव्यानं पुन्हा वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. नितेश राणेंनी आधी इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

नितेश राणे हे जसे पक्ष बदलतात तसं ते जो सांगतात तो इतिहासही बदलत असतो असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. नितेश राणे इतिहासाचे चुकीचे दाखले देत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लीम मावळे नसल्याचं सांगून आपलं अज्ञान जाहीर केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि शिवरायांचे थेट वंशज असलेले उदयनराजेही असहमत असल्याचं दिसले.
नितेश राणे हिंदुत्ववादी भूमिका मांडत असतात. पण ही भूमिका मांडणं बरोबर की चूक हा दुय्यम मुद्दा. पण हे करत असताना नितेश राणेंनी इतिहासाची चुकीची मांडणी करु नये अशी शिवप्रेमींची माफक अपेक्षा आहे.

 

Read More