Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : सालियन मृत्यू प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशानात ( Maharashtra Winter Session 2022 ) चांगलाच गदारोळ माजला आहे.  शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी देखीलखळबळजनक दावा केला आहे.  आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांमुळे Disha Salian प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.

दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

नितेस राणेंनी केली आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी नितेश राणेंनी केली. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है
असं राणे म्हणालेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिलाय. तसंच मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशा सालियन प्रकारणात महत्वाची घोषणा

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे कधीच नव्हता, त्यामुळे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही असंही फडणवीस सभागृहात म्हणाले. 

दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत तुफान गदारोळ झाला. पाच वेळा कामकाज स्थगित झालं. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचं राजकारण कोणी करू नये, राजकीय अँगलने या मुद्द्याकडे पाहू नये असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले.
आदित्य ठाकरेंवर काय आरोप झालाय?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता. यावरुनच हिवाळी अधिवेशनात देखील गदारोळ माजला आहे.  विविध मुद्यांवरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे जुन प्रकरण उकरुन काढल्याचे प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. 

TAGS

Nitesh raneAditya ThackerayDisha Salian Death Caseनितेश राणेआदित्य ठाकरेWinter assembly sessionMaharashtra Winter SessionWinter Session of Maharashtra Legislaturemaharashtra assembly session 2022 schedulewinter session maharashtra 2022Maharashtra assembly winter sessionmaharastra hiwali adhiveshan 2022महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनहिवाळी अधिवेशन २०२२ नागपूरमहाराष्ट्र हिवाळी अधिवेशन २०२२महाराष्ट्र विधी मंडळ अधिवेशनमहाराष्ट्र विधीमंडळविधीमंडळ अधिवेशननागपूर अधिवेशनमहाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्र ताज्या बातम्यामराठी ताज्या बातम्याआजच्या ताज्या बातम्याराजकारणमहाराष्ट्र राजकारणMaharashtra PoliticalMaharashtra political newsmarathi newsmarathi news todaylatest marathi newsMarathi breaking newsMarathi Breaking News Todaymarathi news liveमराठी बातम्याताज्या मराठी बातम्यामराठी ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्रातील ताज्या बातम्याzee 24 taas marathi news livezee 24 taas marathi news
Read More