Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

MVA Morcha Rashi Thackeray : "महाआघाडीचा आजचा मोर्चा भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी"

भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य!

MVA Morcha Rashi Thackeray :

Nitesh Rane on Rashmi Thackeray  : छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांचा अवमानकारक वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हल्लाबोल मोर्चा काढला होता. या विराट मोर्चामध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही रस्त्यावर उतरत मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. रश्मी ठाकरे मोर्चात सहभागी झाल्या त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. याचाच धागा पकडत भाजप नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. 

 

आजच्या महाआघाडीच्या हल्लाबोल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी होता? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. इतकंच नाहीतर दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा, असा सल्लाही राणेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे. 

Read More