Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जागतिक तापमानवाढीमुळं भविष्यात जगावर येणार मोठं संकट; वितळलेल्या पाण्यातून बाहेर पडणार...

NIV Alert About Virus: जागतिक तापमानवाढीमुळं जगावर भविष्यात मोठं संकट कोसळू शकतं, असा इशारा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने दिला आहे. 

जागतिक तापमानवाढीमुळं भविष्यात जगावर येणार मोठं संकट; वितळलेल्या पाण्यातून बाहेर पडणार...

NIV Alert About Virus: तापमावाढीमुळं फक्त भारतातच नाही तर जगावर संकट ओढवलं आहे. तापमानवाढीमुळं प्रदूषणाचा फटका तर बसत आहेच पण त्याचबरोबर अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळत आहे. बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेनंतर जगावर पुन्हा एकदा मोठं संकट येऊ शकते. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (एनआयव्ही)ने यासंदर्भात धोक्याचा इशारा दिलेला आहे. भविष्यात नवीन रोगाच्या साथी येऊ शकतात, असा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. 

 अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत. हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येऊ शकतात, असा इशारा नआयव्हीचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिला आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भविष्यात नवीन रोगाच्या साथी येणार आहेत. याला प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ कारणीभूत ठरणार आहे. तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेटस्टवरील बर्फ आणि हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून गोठलेले स्थितीत असलेले जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत. ते पुढे प्राणी आणि मनुष्याच्या संपर्कात येऊन नवीन साथी येणार आहेत. आगामी काळात हा धोका वाढत जाणार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांमधील संपर्क वाढल्यानेही साथरोग पसरत आहे. याचबरोबर जागतिकीकरणामुळे जगभरात मानवाचा प्रवास वाढला असून, त्यातून रोगांचा प्रसारही होत आहे, असं डॉ. नवीन कुमार यांनी म्हटलं आहे.

नवीन रोगांच्या साथींना आपण प्रतिबंध करू शकत नाही. मात्र, आपण त्यांचा सामना करण्यास आता सज्ज आहोत. आपल्या काही लसी सध्या आहेत, तर काही नवीन लसींवर आपण संशोधन करीत आहोत. बर्ड फ्ल्यूवरील लस विकसित करण्याचे काम आपल्याकडून सुरू आहे. अमेरिका आणि युरोपकडे या लसीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आयसीएमआर मंकीपॉक्स, डेंग्यू, चिकुनगुन्या यावरील लस विकसित करण्याचे काम सुरू आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read More