Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'एटीएम'मध्ये नोटा का नाहीत? कारण दड़लंय नाशिकमध्ये...

दहा राज्यातील एटीएममध्ये नोटांच्या तुटवड्या मागचं खरं कारण, नाशिकमध्ये दडल्याचं आता पुढे आलं आहे.

'एटीएम'मध्ये नोटा का नाहीत? कारण दड़लंय नाशिकमध्ये...

नाशिक :  दहा राज्यातील एटीएममध्ये नोटांच्या तुटवड्या मागचं खरं कारण, नाशिकमध्ये दडल्याचं आता पुढे आलं आहे. नोव्हेंबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेनं नोटा छपाईची ऑर्डरच दिलेली नसल्याचं उघ़ड झालं आहे. नाशिकच्या टाकसाळीमध्ये सध्या क्षमतेच्या केवळ 44 % काम सुरू आहे. त्यामुळे 10 राज्यात रोखीवर परिणाम झाल्याचं दिसतंय. त्याचबरोबर 20 आणि 100च्या नव्या नोटांचं डिझाईन तयार नसल्यानं त्याचीही छपाई बंद आहे. त्यामुळे तुटवड्यात भर पडली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दहा राज्यातल्या एटीएममधील ख़डखडाट आणि चलनाच्या तुटवड्य़ानंतर सरकार आणि रिझर्व्ह बँकेला जाग आली आहे. नव्या 500च्या नोटांची छपाई तातडीनं सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण प्रक्रिया पूर्ण करून नोटा चलनात येण्यास किमान १५ दिवस लागणार आहेत.

Read More