Ganesh Naik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील दोन नेत्यांचा सुप्त संघर्ष आता लपून राहिलेलं नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. गणेश नाईक यांनी तर मंत्री झाल्यानंतर अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी यांच्याविषयी नाराजी व्यक्त एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचल्याचं पाहायला मिळालं.
'एकनाथ शिंदेंच्या काळात कामं झाली नाहीत'
ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्ध आता संघर्षात रुपांतरीत होताना दिसतं आहे. मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं पाहायला मिळतं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामं झाली नसल्याचं म्हणत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, आता महानगरपालिका, सिडको आणि एमआयडीसीमधील अधिकारी कामं करायला लागल्याचं सांगायलाही गणेश नाईक विसरले नाहीत.
गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा निशाणा
मंत्री झाल्यापासून गणेश नाईक यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांची इच्छा नसतानाही काही चुकीच्या गोष्टी घडल्या असं वक्तव्य गणेश नाईक यांनी महिनाभरापुर्वीच केलं होतं.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र गणेश नाईक यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर गणेश नाईक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांच्या काळात कामं झाली नसल्याचं म्हणत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.