Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुणे पोलिसांची खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना नोटीस

पुण्यात आयोजित कार्यक्रमासाठी आलेले एमआयएमचे खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली.

पुणे पोलिसांची खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना नोटीस

पुणे : पुण्यात आयोजित कार्यक्रमासाठी आलेले एमआयएमचे खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली. तोंडी तिहेरी तलाक कायद्याचं समर्थन करण्यासाठी पुण्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं. पुण्यातल्या आझम कॅम्पस इथे आयोजित या सभेतल्या मंचावर येताच ओवेसी यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली. 

ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांची महारॅली

तोंडी ट्रिपल तलाकवर बंदी घालणा-या कायद्याविरोधात पुण्यातल्या मुस्लिम महिलांनी महारॅली काढली. पुण्यातील जामा मस्जिद इथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप आझम कॅम्पस इथे करण्यात आला. 

हजारो मुस्लिम महिलांनी सहभाग

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि पुण्यातील विविध मुस्लिम संघटनांच्या वतीनं आयोजित या रॅलीमध्ये हजारो मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला. दरम्यात ट्रिपल तलाक, शरियत यांच समर्थन करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीतील  संयोजक महिला वगळता इतर महिलांना मात्र, पत्रकारांशी बोलायला मज्जाव करण्यात आला होता. 

Read More