Nursing officer Suicide: घरगुती छोट्या छोट्या वादानंतर त्याचा ताण घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार आजकाल मोठ्या प्रमाणात होताना दिसतायत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जोधपूर एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर असलेल्या डिंपलने आत्महत्या केली. आत्महत्या करताना डिम्पलने बॉयफ्रेण्डला व्हिडीओ कॉल केला होता. काय आहे हा नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
नर्सिंग ऑफिसर असलेली डिम्पल विवाहित होती पण तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. ती तिचा बॉयफ्रेंड यश शखला सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच तिने आत्महत्या केली. नर्सिंग ऑफिसर डिम्पल राजस्थानच्या महादेव नगर बासनी येथे भाड्याच्या घरात राहत होते. ती मूळची गुजरातची होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
डिम्पलचे वडील राजू भाई हे गुजरातमधील रहिवासी असून त्यांनी मुलीच्या आत्महत्येसंदर्भात तक्रार दिली आहे. माझी मुलगी चित्रा डिंपल जोधपूर एम्स रुग्णालयात नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करत होती आणि महादेव नगर बासनी येथे भाड्याच्या घरात राहत होती. 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मुलगी डिंपलचा अपघात झाला असे मला कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बसनी पोलिस स्टेशनचे अधिकारी नितीन दवे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच नर्सिंग ऑफिसरचे वडील राजू भाई त्यांच्या नातेवाईकांसह जोधपूरला पोहोचले. डिंपलने गळफास घेतल्याचे कळताच मैत्रिणींनी तिला ताबडतोब फासावरून खाली उतरवले आणि एम्स रुग्णालयात आणले. तिथे सीपीआर देऊन डिम्पलला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत डिंपलचा मृत्यू झाला होता, अशी माहिती नर्सिंग ऑफिसरच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या अहवालात दिलीय.
डिम्पलने आत्महत्या केली तेव्हा तिचा फोन व्हिडिओ कॉल सुरु होता. त्या फोनवर दुसऱ्या बाजूस यश शखला नावाचा तरुण बोलत होता. यश शखलाने स्वतः फोन करून डिंपलच्या मित्रांना तिची चौकशी करायला सांगितले. मग मित्र खोलीत गेले आणि डिंपल फाशीला लटकलेली दिसली.
डिम्पलचे 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ती सुमारे दीड वर्ष तिच्या सासरच्या घरी राहिली त्यानंतर ती तिच्या सासरच्या घरी गेली नाही, असे राजू भाईंनी त्यांच्या तक्रारीत सांगितले. डिंपलच्या सासरच्या घराचे घर पालनपुरात आहे आणि तिच्या पतीचे नाव जेनिस बोरवाल आहे. ती 2 वर्षांपासून जोधपूर एम्समध्ये काम करत होती, अशी माहितीही त्यांनी दिली.