Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाण्यात घातक स्फोटकांसह एकाला अटक

 मुंब्रा पोलिसांनी ठाणा हद्दीतील दिवा येथील आगासन रोड येथे रेल्वे फाटक परिसरात एक व्यक्ती जिलेटीन आणि डिटोनेटर घेऊन येणार असल्याची माहीती मिळताच पोलिसांनी एकाला अटक केली. 

ठाण्यात घातक स्फोटकांसह एकाला अटक

ठाणे : मुंब्रा पोलिसांनी ठाणा हद्दीतील दिवा येथील आगासन रोड येथे रेल्वे फाटक परिसरात एक व्यक्ती जिलेटीन आणि डिटोनेटर घेऊन येणार असल्याची माहीती मिळताच पोलिसांनी ४२ वर्षीय गणपतसिंग सोलंकी याला अटक केली. 

सध्या तो मुंब्रा देवी कॉलनी येथे राहत होता. त्याच्याकडून २५० जिलेटीनचं कांड्या ,निळी कॅप असलेले २५० डिटोनेटर असा एकूण १२ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्याविरोधात भारतीय स्फोटक अधिनियम १९०८ चे कलम  ५ अन्वये  दाखल करण्यात आला आहे.

तो मूळचा उत्तर प्रदेश महिला भिलवारा जिल्ह्यातील असलेल्या सोळंकी ही घाटक स्फोटके नेमके कोणत्या कारणासाठी घेऊन आला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. 

Read More