Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'पद्मावत' वाद : जालन्यात तोडफोड, तीन जण ताब्यात

पद्मावत चित्रपटाला जालना शहरातही विरोधाचा सामना करावा लागला. 

'पद्मावत' वाद : जालन्यात तोडफोड, तीन जण ताब्यात

जालना : पद्मावत चित्रपटाला जालना शहरातही विरोधाचा सामना करावा लागला. 

काल मध्यरात्री अज्ञात लोकांकडून नीलम आणि रत्नदीप या दोन सिनेमगृहावर दगडफेक करण्यात आली. 

या दगडफेकीत सिनेमगृहाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिनेमगृहाच्या बाहेरील भागाचे नुकसान काही प्रमाणात झालंय.

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी दोन्हीही सिनेमगृहाच्या स्थळी जाऊन पाहणी करत तोडफोड करणाऱ्या ३ संशयितांना ताब्यात घेतलं. 

Read More