Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पालघरमध्ये शिवसेना नेत्याचं अपहरण? चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  पोलीस चौकीतून संशयित आरोपी फरार झाला आहे. 

 पालघरमध्ये शिवसेना नेत्याचं अपहरण? चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार

Palghar Crime News : पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत. 20 जानेवारीपासून ते बेपत्ता असल्यानं त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जातोय. अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला आहे. अशातच . चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. 

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांच अपहरण केल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप . घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर चौकशीसाठी आलेला संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार . घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाशचा शोध सुरू आहे.

एकीकडे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या आणि अपरहणाचं प्रकरण देशभरात गाजत असताना दुसरीकडे पालघरमधून शिवसेनेचे नेते बेपत्ता झाल्यानं खळबळ उडालीय. शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता आहे. 20 जानेवारीपासून धोंडी यांचा पत्ता लागत नाहीये. 20 जानेवारीला संध्याकाळी त्यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला. त्यामुळे अशोक धोंडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आऱोप आता कुटुंबियांनी केलाय. तसेच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिलीय. आता पोलिसांकडून संशयित आरोपींची चौकशी करण्यात येते असतानाच आरोपी फरार झाला आहे. अशोक धोडींच्या शोधासाठी पोलिसांनी काही पथकं स्थापन केलीय.. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येतोय... पोलिसांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील वाई बोरीगाव परिसरातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले. 

Read More