Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक! अल्पवयीन मुलाला गुटख्याचा नाद, वडिलांनी असा केला शेवट

गुटख्याचा नाद असा झाला घात... वडिलांनी असा केला शेवट पाहा नेमकं काय घडलं

धक्कादायक! अल्पवयीन मुलाला गुटख्याचा नाद, वडिलांनी असा केला शेवट

सचिन कसबे, झी 24 तासअकलूज: वडिलांनीच आपल्या काळजाच्या तुकड्याला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथे वडिलांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यसन घर उद्ध्वस्त करतं. असं म्हटलं जातं. याच व्यसनाला कंटाळलेल्या वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथील प्रशांत सावंत यांचा 12 वर्षांचा मुलगा व्यसन करत होता. सतत गुटखा खात असल्याचा राग वडिलांना होता. 

आपल्या पोटचा मुलाला समजवूनही ही सवय सुटत नव्हती. त्याची ही सवय वडिलांच्या डोक्यात गेली. अशा परिस्थितीत त्याने 2 घरांमध्ये चोरीही केली. त्याची नुकसान भरपाई सुद्धा वडिलांना भरावी लागली होती. 

28 नोव्हेंबर रोजी त्याने एके ठिकाणी चोरी केली होती. त्याची कबुली त्याने दिली होती. या सततच्या प्रकारमुळे बदनामी झाल्याची वडिलांची भावना झाली. या सगळ्या रागातून त्यांनी आपल्या मुलाची हत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. अकलूज पोलीस स्टेशन मध्ये आज वडील प्रशांत सावंत वर गुन्हा दाखल झाला आहे.

Read More