Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साखर कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू तर ५ जण जखमी

जखमींवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

साखर कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू तर ५ जण जखमी

परभणी :  तालुक्यातील अमडापूर येथील लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झला तर इतर ५ कमगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्यावेळी हे कामगार मशीनच्या सर्व्हिसिंगचं काम करत होते. टर्बाईनमध्ये ओव्हर ऑयलिंग करताना टर्बाईन मशीनचा स्फोट झाला. 

स्फोटातील जखमींवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युसूफ अली साहेब अली शेख (६५)असे मृत इसमाचे नाव आहे. तर जखमींमध्ये बाळआसाहेब गोविंदराव दंडवते(४५), सुभाष पेंडगे(५०), नरहरी शेजुळ(३५), ज्ञानेश्वर कन्हाळे (३०), आणि शेशराव वाघ (४०) यांचा समावेश आहे.

या स्फोटामुळे अमडापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी घडली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. अद्यापही स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्याचे पो.नि. पाडाळकर अधिक तपास करत आहेत.  

Read More