Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

... म्हणून अकोल्यातील लोक शेण आणि गोमूत्राने करतात आंघोळ

वाढत्या उन्हामुळे जिव्हाची लाही लाही होत आहे. अश्यातच उन्हामुळे शारीरिक त्रासही वाढत आहे. मात्र शरीराला या त्रासापासून बचाव म्हणून अकोल्यातील आदर्श गौ सेवा केंद्रात एक प्राचीन पद्धतीचा वापर केला जात आहे.

... म्हणून अकोल्यातील लोक शेण आणि गोमूत्राने करतात आंघोळ

अकोल्यामध्ये लोकं अक्षरशः अंगाला शेण आणि गोमूत्र लावत आहेत. सुरुवातीला हे सर्व पाहून तुम्हाला वाटत असेल की, ही रंगपंचमी आहे की काय? नाही हे अजिबात नाही. हे आहे 'गोमय स्नान'. अकोल्यातील म्हैसपूर येथील आदर्श गौसेवा केंद्रात उन्हाळ्यात प्रत्येक रविवारी गोमय स्नान अर्थात गोबर स्नानच आयोजन केलं जातं. अनेक वर्षांपासून येथे शहरातील आणि पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने येतात. 

त्वचेच्या रक्षणासाठी गायीचे शेण आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. ते अंगाला लावत त्याचे सचैल स्नान केल्याने त्वचेला लकाकी येते. त्वचेच्या रक्षणासाठी साबण व शॅम्पूपेक्षा शेण, गोमूत्र अधिक चांगले असल्याचा दावा या वेळी केला जात आहेय. या केंद्रात 600 गायी आहेत. त्याचे मोठ्या प्रमाणावर शेण, गोमूत्र उपलब्ध असते, तेथे गौभक्त अंगाला शेण - गोमूत्र लावतात. यानंतर तासभर त्यात अक्षरशः खेळतात आणि त्यानंतर साध्या पाण्याने आंघोळ करतात. याचे अनेक फायदे असल्याने दिवसेंदिवस यात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

गायीचे शेण व गोमूत्र वैज्ञानिकदृष्ट्यादेखील महत्त्वाचे मानले गेले आहे. बदलत्या काळात गायीच्या शेण-गोमुत्राचा वापर मागे पडत चालला असला तरी शास्त्रीयदृष्ट्या त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. मोठ्या शहरात गोमय स्नानासाठी मोठे पैसे आकारले जातात मात्र या केंद्रात हे निःशुल्क उपलब्ध केल्या जाते.

गाडीला लावला लेप 

पंढरपूरच्या रहिवाशाने आपल्या नव्या कोऱ्या कारचा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी चक्क गोमूत्र आणि शेणाचा लेप लावला आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना कोणत्याही तांत्रिक बाबींची मदत न घेता नैसर्गिक पद्धतीने गारवा मिळवण्यासाठी कारला शेण आणि गोमूत्राचा लेप लावला. 

Read More