Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साताऱ्यात पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

साता-यातील धोम धरणात बुडून पीएच.डी करणा-या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.

साताऱ्यात पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

मुंबई : साता-यातील धोम धरणात बुडून पीएच.डी करणा-या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.

सोमजीत शहा आणि अविनाश दुनेड अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे दोन्ही विद्यार्थी मुंबईमधील टाटा इन्सिटीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या कॉलेजचे पी.एचडीचे विद्यार्थी होते. एकुण चार विद्यार्थी या धोम धरणावर आले होते. रिसर्च प्रोजेक्टसाठी धरणाचा अभ्यास करण्यासाठी हे विद्यार्थी इथं आले होते.

वाईपासून 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोंढवली गावच्या हद्दीत आल्यानंतर या चौघांपैकी दोघांनी पोहण्यासाठी धरणात उड्या टाकल्या. मात्र या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गाळात अडकले...आणि त्यांचा मृत्यू झाला. 

Read More