Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बार्शी हादरली! मेव्हण्याचे नणंदेबरोबर अनैतिक संबंध; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीने ट्रिमरने...

Harassment of Women By Husband: या महिलेच्या आयुष्यात लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरु होतं. मात्र अचानक असं काही घडलं की तिचा छळ होऊ लागला.

बार्शी हादरली! मेव्हण्याचे नणंदेबरोबर अनैतिक संबंध; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीने ट्रिमरने...

Harassment of Women By Husband: बार्शी शहरामध्ये अत्यंत विचित्र घटना घडली असून प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे. शहरातील धर्माधिकारी प्लॉट येथे राहणाऱ्या एका विवाहिचा पती, नणंद आणि मेव्हण्याने वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलेचं तिच्याच सासरच्या तीन लोकांनी जबरदस्तीने मुंडण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी विवाहितेने बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

सगळं सुरळीत सुरु होतं पण...

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली तिचे लग्न झाले आहे. या महिलेचा तिच्या पतीसोबत संसार सुरळीत चालू होता. मात्र, काही महिन्यांपासून तिला नणंद व मेव्हण्याच्या वर्तणुकीत मोठा बदल दिसून येत होता. मेव्हण्याचे नणंदेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे तिला समजले. ही बाब तिने पतीला सांगितल्यानंतर पतीने तिच्या आरोपांवर विश्वास ठेवण्याऐवजी तिच्यावरच संशय घेत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

गळा दाबला, केस ओढलं, भुवयांवरुन...

8 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास पती, नणंद व मेव्हण्याने एकत्र येत पीडितेला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेव्हण्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर नणंदेने तिचे केस ओढल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पतीने या महिलेला लाथाबुक्यांनी मारत करत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने तिच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवत चेहरा विद्रुप केला. जबरदस्तीने या महिलेला मुंडण करण्यास भाग पाडले.

कुटुंबाला संपवण्याची धमकी

याप्रकरणी त्रास असह्य झाल्याने विवाहितेने तिच्या बहिणीकडे धाव घेतली. पती व मेव्हण्याने या माहिलेवर अत्याचार केल्यानंतर तिला धमकावताना, 'घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाकडे काही सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना ठार मारु', अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरुनच ही महिला आतापर्यंत गप्प बसली होती. मात्र, वारंवार होणारा हा त्रास असहाय्य झाल्याने तिने हिंमत दाखवत बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, नणंद व मेव्हण्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read More