Pilot refuses to take off Eknath Shinde plane : राजकीय वर्तुळातील अनेक घडामोडी लक्ष वेधत असताना एका अनपेक्षित घटनेनं राज्यात अनेकांचच लक्ष वेधलं. जळगाव विमानतळावरील या प्रसंगानंतर काहींच्या भुवयाही उंचावल्या कारण, एकनाथ शिंदे यांच्या विमानाच्या पायलटचा विमान उडवण्यास नकार आल्यानं शिंदे यांना पुढील प्रवासासाठी रवाना होण्यास विलंब झाल्याचं पाहायला मिळालं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावरून परतत असताना त्यांना काही वेळ जळगाव विमानतळावरच ताटकळत रहावं लागलं. यास कारण ठरला तो म्हणजे त्यांच्या विमानाचा वैमानिक. वैमानिकाच्या कामाचे तास संपल्यानंतर पुन्हा परवानगी घेण्यास काहीसा वेळ दवडला जातो. ज्यामुळं परवानगी मिळेपर्यंत विमान उडवण्यास त्या वैमानिकानं स्पष्ट नकार दिला आणि तिथं नेतेमंडळींचा खोळंबाच झाला.
वैमानिक नकार देत असल्याचं पाहिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अगदी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून वैमानिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरूच राहिला. कालांतराने 20 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर अखेर एकनाथ शिंदे यांचं विमान रवाना झालं. माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार वैमानिकाच्या तब्येतीची अडचण आणि तांत्रिक बाबींमुळे विमान उड्डाणास विलंब झाला. मात्र विमान कंपनईशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला.
उपलब्ध माहितीनुसार जळगाव विमानतळावर मंत्री गिरीश महाजन , मंत्री गुलाबराव पाटील यांनी समजूत काढल्यानंतर तिन्ही पायलट यांच्याशी एकनाथ शिंदे यांचीही चर्चा. विमानतळावर प्रतीक्षालयात बंद दाराआड वैमानिकाशी एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली आणि त्यानंतर विमान पुढच्या प्रवासाला रवाना झालं.
मुक्ताईनगर येथील दौरा आटोपून एकनाथ शिंदे विमानतळावर दाखल झाले होते. मात्र तिथंच वैमानिकानं विमान उडवण्यास नकार दिल्यानं त्यांना मुंबईला पोहोचण्यास उशीर झाला. ज्यानंतरच्या चर्चेतून यावर तोडगा काढत वैमानिकासह एक असिस्टंट वैमानिक विमान घेऊन हे विमान मुंबईकडे रवाना ढालंय