Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चिंचवड: चाफेकर चौकात तरुणाची निर्घृण हत्या

 गंभीर जखमी झालेल्या आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला.

चिंचवड: चाफेकर चौकात तरुणाची निर्घृण हत्या

पिंपरी चिंचवड : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चिंचवडच्या चाफेकर चौकात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आकाश लांडगे असं या युवकाचं नाव आहे. आकाश लांडगे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, रणजीत चव्हाण या आणखी एका सराईत गुंडानेच त्याचा खून केल्याचं उघड झालं आहे.

उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू

चाफेकर चौकात रणजीतनं आकाशच्या डोक्यात कुंडी घालून त्याला जखमी केलं. त्याआधी आकाशवर कोयत्यानं वारही करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला.

परिसरात भीतीचे वातावरण

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More