PMPML to Launch Double-Decker Buses in Pune : मुंबई प्रमाणेच पुणेकरांना देखील डबल डेकर बसने प्रवास करता येणार आहे. मुंबई प्रमाणे पुण्यात देखूल डबल डेकर बस धावणार आहे. संपूर्ण पुण्यात नाही तर ठराविक परिसरात ही डबल डेकर बस धावणार आहे. जाणून घेऊया पुण्यात नेमकी कुठे धावणार आहे ही डबल डेबक बस.
पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘डबल डेकर’ बस सेवा सुरू केली जाणार आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीएलकडून इलेक्ट्रिक डबल डेकर बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे. पुण्यात डबल डेकर बस सुरु करण्याच्या अनुषंगाने मुंबईतील ‘बेस्ट’च्या डबल डेकर बसची पाहणी करण्यात आली.
पुण्याची डबल डेकर बस सेवा ही हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आयटी पार्क परिसरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. प्रत्येक बसमध्ये 70 आसन आणि 40 उभ्या जागांसह एकूण 110 प्रवासी प्रवास करू शकतील. ही वातानुकूलित बस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. पीएमपीकडून कंपनीसोबत बोलणी सुरू केलं आहे. दोन बस प्रायोगिक तत्त्वावर पुण्यात धावणार आहेत. यशस्वी झाल्यास डबल डेकर सेवेचा विस्तार केला जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ४६ एसटी बस फुल्ल झाल्यात. गणेशोत्सवासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून कोकणात जाणाऱ्या एसटी बससाठी बुकिंगला जोर आला आहे. स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड आगारातून सोडण्यात येणाऱ्या 46 विशेष एसटी बस पूर्णपणे भरल्यात, तर इतर बसचं 50 टक्क्यांहून अधिक बुकिंग झाल आहे.