Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पोलिसाने गमावला जीव

 पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पोलिसाने गमावला जीव

अंबरनाथ : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक बळी जात असल्याच्या घटना रोज समोर येत असतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढलेले असते. याच खड्ड्यांमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अंबरनाथ पोलीस स्टेशन समोरच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातून  संताप व्यक्त होत आहे. संजीव पाटील असे या मृत पोलिसाचे नाव आहे.

बिग सिनेमा चौकातून पाटील हे पोलीस स्टेशन परिसराकडे येत असताना रस्त्यावरील खड्डा चुकवत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पाटील मूळचे जळगावचे रहिवासी होते, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. अपघातानंतर त्यांचे पार्थिव जळगाव येथे नेण्यात आले. कल्याण - बदलापूर महामार्गाचे चौपदरीकरण रखडले असून अंबरनाथ हद्दीतील रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्यामुळे रोज असे अपघात होताहेत.

Read More