Raigad Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आलेला असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां तोंडावर आलेल्या असतानाच रायगड (Raigad)मध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. जिथं काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षातील एका प्रतिष्ठित आणि बड्या नेत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला साथ देण्याचा निर्मय घेतला आहे. शनिवारी (2 ऑगस्ट) या नेत्याचा पक्षप्रवेश होत असून, त्यामुळं अजित दादांच्या पक्षानं रायगडमध्ये मोठी खेळी करय अचूक नेम साधला असंच म्हटलं जात आहे. (Maharashtra Political News)
रायगडमधील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) यांचे ज्येष्ठ सुपुत्र त्याचप्रमाणं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर (Pravin Thakur) यांनी काँग्रेस पक्षावर असणारी नाराजी पाहता या पक्षातून काढता पाय घेतला आहे. वडिलांवरील अन्यायाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या अजित पवारांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तांना दुजोरा दिला.
वडील मधुकर ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये 38 वर्षे काम केलं, आमदारकीची उमेदवारीसुद्धा त्यांना मिळाली. मात्र त्यांच्यावर अन्यायच झाला असं म्हणत रायगड जिल्ह्यात काँग्रेसनं जनतेचे प्रश्न सोडवलेट नाहीत, ज्यामुळं या पक्षात राहून काय उपयोग?, या शब्दांत खदखड व्यक्त करत प्रवीण ठाकूर यांनी आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं स्पष्ट केलं आणि काँग्रेसला कायमची सोडचिठ्ठी दिली.
राजकीय मतभेद, पद किंवा तत्सम अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं नेत्यांच्या मनात असणारी खदखद अशा कैक कारणांमुळं सध्या विविध पक्षांतील नेते पक्षांतराचा निर्णय घेताना दिसत आहेत. यामध्ये मागील काही दिवसांमध्ये बहुचर्चित ठरलेला पक्षप्रवेश म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा. काँग्रेसचा हात सोडत गोरंट्याल यांनी भाजपला साथ दिली आणि मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यामागोमागच आता रायगडमध्येही काँग्रेसला धक्का मिळाल्यानं महाराष्ट्रात काँग्रेसपुढं मोठ्या अडचणी उदभवताना दिसत आहेत.